स्वदेशी “कोवॅक्सिन”च्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी !

0

नवी दिल्ली :  भारत बायोटेक कंपनीने बनवलेली स्वदेशी कोरोन लस ‘कोवॅक्सिन’च्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यांमधून सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्वयंसेवकांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम झालेले नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे ही लस वापरासाठी योग्य असल्याचे सांगितले जात आहे.

ज्या स्वयंसेवकांना लसी देण्यात आली होती, त्यांच्या शरीरात लसीने अँन्टीबॉडी तयार करण्याचं काम केलं आहे. निष्कर्षांनुसार, चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाच्या शरीरावर लसीचा डोस दिल्यानंतर काही गंभीर परिणाम झाल्याचं समोर आलं होतं. परंतु, त्याचा लसीकरणाशी कोणताही संबंध असल्याचं दिसून आलं नाही. कोवॅक्सिन लसीची सुरक्षा आणि तिच्या प्रभावाच्या आकलनासाठी पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्यात आली होती.

कोवॅक्सिनच्या चाचणीच्या निष्कर्षांच्या कागदपत्रांमध्ये सांगण्यात आलं आहे की, बीबीवी 152 ला दोन डिग्री सेल्सियस ते आठ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये ठेवण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत याच तापमानात वेगवेगळ्या लसींची साठवणूक करण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.