उपेक्षित-वंचित वर्गासाठी कल्याणकारी योजना राबवा
काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या ठाकरे सरकारला सूचना
नवी दिल्ली ः अनुसूचित जाती-जमाती आणि इतर वंचिच उपेक्षित वर्गासाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी सूचना महाविकास आघाडी सरकरला काॅंग्रेसप्रमुख सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. ही माहिती काॅंग्रेतचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिल्लीतून प्रसिद्धीस आलेल्या पत्रकात दिली आहे.
महाविकास आघाडीचा सहकारी म्हणून काॅंग्रेस पक्ष सामाजातील दुर्बल घटक, दलित, आदिवासी, ओबीसी आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सरंक्षणासाठी वचनबद्ध आहे. त्यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने कल्याणाकारी उपक्रम राबविण्याची गरज आहे, अशी विनंती काॅंग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी केली आहे.
राज्यातील शासकीय नोकऱ्यामधील अनुसूचित जाती व जमातीचा अनुषेष विशेष भरती मोहीम राबवावी, सरकारी कंत्राटामध्ये आरक्षण असावे, या समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकास महत्वपूर्ण आहे, त्याला प्राधान्य द्यावे, शिष्यवृत्ती योजना, वसतिगृहाच्या सुविधा, निवासी शाळांचा विस्तार करावा, अशा सूचना सोनिया गांधी यांनी ठाकरे सरकारला दिल्या आहेत.