”हवंतर नव्या कृषी कायद्यांते श्रेय तुम्ही घ्या, पंरतु…”

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली ः ”कृषी मालाची किंमत (एमएसपी) कायम ठेवली जाईल. तसेच शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. हे तिन्ही कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत, यावर मागील २०-२२ वर्षे चर्चा झाली आहे. त्याचबरोबर सर्वच थोड्याफार प्रमाणात चर्चादेखील केली आहे”, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.

दिल्लीच्या सीमेवर मागील २४ दिवसांपासून शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधा आंदोलन छेडले आहे. शेतकरी कायदे रद्द करावे, असे म्हणाताहेत तर, दुसरीकडे भाजपा त्या कायद्यांचे समर्थन करत आहे. अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांनी, शेतकरी संघटनांनी आणि कृषी तज्ज्ञांनी कायदे सुधारण्याची मागणी केली होती. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी घोषणापत्रात तसे लिहिलेदेखील होते, मात्र, प्रत्यक्षात त्यांनी केली नाही.”
मोदी भावनिक आवाहन करत म्हणाले की, ”मी शेतकऱ्यांना अन्नदाता समजतो. मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो की, नव्या कायद्यांते श्रेय तुम्ही घ्या. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहे, मला त्यांची प्रगती करायची आहे.” मोदी पुढे म्हणाले की, ”आम्ही स्वामीनाथन आयोगाचा अहवाल फायलींच्या ढिगाऱ्या बाहेर काढला, तो लागू केला. शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट एमएसपी दिला. तो पुढेही तसाच लागू राहील, त्यात कोणताही बदल होणार नाही. एमएसपी बंद होणार या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. विरोधकांचे शेतकरी प्रेम हे निव्वळ ढोंग, ते केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करीत आहे”, अशी टीका नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केली.
Leave A Reply

Your email address will not be published.