मुंबई ः राज्यामध्ये दिवसभरामध्ये ३ हजार ९४० करोना रुग्णांची नोंद आहे, तर ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ३ हजार ११९ करोना रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत, अशा माहिती राज्य आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
”राज्यात आज ३,९४० करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३,११९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १७,८१,८४१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६१,०९५ एक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.१४ टक्के झाले आहे”, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.
दिवसभरात राज्यामध्ये ७४ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाचा मृत्यूदर २.५७ टक्के वर गेला आहे. आतापर्यंत १,२०,५९,२३५ नमुन्यांपैकी १८,९२,७०७ (१५.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच सध्या ५,००,३६० रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. तर ४,०२० लोक इन्स्टिट्युशनर क्वारंटाइन आहेत.