नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमेवर सुरू असणारे शेतकरी आंदोलन जास्तच चिघळत चालले आहे. अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत गुरू तेगबहादूर यांनी नमन केले आहे. विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्यात कोणत्याही प्रकारची व्हीआयपी व्यवस्था नव्हती की, पोलीस बंदोबस्त नव्हता, अगदी साध्या पद्धत्तीने त्यांनी दर्शन घेतले.
पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवरून इंग्रजी आणि पंजाबी भाषेत ट्विट करण्यात आले आते. त्यात असे म्हटलं आहे की, ”जिथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब गुरुद्वारात आज सकाळी मी प्रार्थना केली. मला अत्यंत प्रसन्न वाटलं. मी जगातील कोट्यावधी लोकांप्रमाणेच श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणानं मलाही खूप प्रेरणा दिली आहे”, अशी भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या या भेटीनंतर व्यक्त केलीय.
पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांविरोधात मागील २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केले आहे, त्यामध्ये कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार पोहोचलेलं नाही. अशा परिस्थितीत मोदींनी गुरु तेगबहादूर यांचं दर्शन घेऊन पंजाबच्या शेतकऱ्यांबद्दल कनवाळू वृत्ती असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Some more glimpses from Gurudwara Rakab Ganj Sahib. pic.twitter.com/ihCbx57RXD
— Narendra Modi (@narendramodi) December 20, 2020