मुंबई ः अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ३६ वाढदिवस साजरा करत आहे. अंकिताने यंदाच्या वाढदिवसादिवशी आपल्या जवळच्या मित्रांना बोलविले होते. या पार्टीमध्ये संदीप सिंहदेखील होता, असा दावा केला जात आहे. त्यानंतर अंकिताला नेटकऱ्यांनी चांगलीच ट्रोल केली आहे. सुशांत सिंह राजपूतचे चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सुशांत सिंहच्या फेसबुक पेजवर अंकिताच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अंकिताच्या बर्थ-डे पार्टीला संदीप सिंह उपस्थित राहणं सुशांतसिंहच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात संदीप सिंहचं नाव वादामध्ये आलेलं होतं. सध्या तरी अंकिताकडून ट्रोलर्सना कोणतही उत्तर आलं नाही. संदीप सिंह हा सुशांत आणि अंकिता लोखंडे दोघांचा दोस्त होता.
अंकिताने आपला वाढदिवस खूप आनंदात साजरा केला आहे. रश्मी देसाईदेखील या पार्टीमध्ये दिसली आहे. तिचे मित्र डान्स करत धमाल करताना दिसले. अंकिता नुकतीच सुशांतच्या आठवणीत भावनिक झाली होती. रिश्ते पुरस्काराच्या चित्रीकरणादरम्याने अंकिताने श्रद्धांजली वाहिली होती. यावेळी अंकिताने सुशांतच्या अनेक गाण्यांवर डान्स केला होता. आणि ती म्हणाली होती की, सुशांत आणि माझे नाते पवित्रच नाही तर अमर आहे.