तेलंगणा : करोना आणि टाळेबंदीच्या काळात अनेक स्थलांतरीच्या संकटात देवासारखा धावून येणारा अभिनेता सोनू सूद हा आता काही परमेश्वरापेक्षा कमी नाही. कारण, तेलंगणातील सिद्दीपेट येथे सोनू सूदचे चक्क मंदीर उभारण्यात आले आहे.
तेलंगणाच्या डुब्बा टांडा गावातील नागरिकांनी सिद्दीपेट जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हे मंदीर उभे केले आहे. नुकतेच या मंदिरात सोनू सूदच्या मुर्तीच्या अनावरण करण्यात आले आहे. याप्रसंगी गावातील महिलांनी सोनू सूदच्या मुर्तीच्या अनावरणाप्रसंगी पारंपरिक वेशभूषेसह लोकगीतं गायली.
करोनाच्या प्रारंभीच्या काळात सोनूने गरीब मजुरांना घरी पाठविण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं होतं. प्रत्येकाच्या अडचणीच्या काळात सोनू मदत केलेली होती. आता कोणा गरजूला मदत हवी असेल तर, सोनूकडे सोशल मीडियाकडे मागणी केली की, तो लगेच मदतीसाठी धावून जातो. सोनूचा हा दानशूरपणाच लोकांनी लक्षात त्याचे हे मंदीर तयार केले आहे.
करोना काळात मजुरांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी, गरजवंतांना मदत करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपली ८ ठिकाणी असलेली मालमत्तादेखीस तारण ठेवली आहे. त्यातून १० कोटी जमविले होते आणि याचकांना सढळ हाताने मदत केली आहे.