”तुमच्याकडे दुर्लक्षच केलेलं बरं”

0

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला काही दिवसच झाले आणि अंकिता लोखंडे हिने धूमधडाक्यात आपला वाढदिवस साजरा केला म्हणून सुशांतसिंहच्या चाहत्यांनी अंकिता प्रचंड ट्रोल केले होते. अखेर अंकिताने ट्रोलर्सना परखड शब्दांत सुनावले आहे आणि वाढदिवसाचे काही फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

अंकिताने टोलर्सना उत्तर देताना म्हटलंय की, ”तुमच्या शुभेच्छा मिळाल्या. त्यासाठी सर्वांचे आभार. तुम्ही जो तर्क काढता, त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे. तुम्ही जसा विचार करता तसेत तुमचे आयुष्य असले पाहिजे. रिलॅक्स घ्या. तुम्ही खूप काही केले. आता एक दिर्घ श्वास घ्या आमि गोष्टी काळासोबत पुढे जाऊ द्या. प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा प्रयत्न करा”, असे परखड मत अंकिताने टोलर्सना दिले आहे.

अंकिताच्या बर्थ डेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये सुशांतच्या चाहत्यांना ही बाब खटकली होती. कारण, सुशांच्या मृत्यूला काही दिवसच झाले आहेत आणि अंकिताने आपला बर्थ-डे धुमधडाक्यात साजरा केला. त्यात संदीप सिंगही पार्टीत दिसला, त्यामुळे सुशांतचे चाहते प्रचंड चिडले आणि अंकिता ट्रोल केले होते.त्याला अंकिता मुहतोड जवाब दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.