मुंबई ः मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर या जोडीची सोशल मीडियावर खूपच चर्चा होती. मागील वर्षी जानेवारी महिन्यातच या दोघांचा साखरपुडा झाला होता. आता हे जोडपे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. कारण, अभिनेत्री इशा केसकरच्या घरी पहिले केळवण झाले आहे.
सिद्धार्थ आणि मितालीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्या दोघांचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडलेले आहेत. असे असले तरी दोघांच्या लग्नाची तारीख अजूनही कळलेली नाही. चाहते नव्या वर्षात जानेवारीत लग्न करतील, असा तर्क लावत आहेत. लग्न कधी करणार याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली आहे.
सिद्धार्थने अग्निहोत्र या मालिकेपासून अभिनय करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर झेंडा, बालगंधर्व, सतरंगी रे, क्लासमेट्स, वजनदार या मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे . तर, मितालीने ‘उर्फी’ सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली होती. फेशर्स या मालिकेतही तिने अभिनय केला होता.