मुंबई ः केवळ टीआरपीमुळे ‘सावित्री ज्योती’ ही मालिका बंद पडत आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेली मालिका बंद पडत असल्यामुळे निर्माते महेश टिळेकर यांनी खंत व्यक्त केली आहे.
”फक्त टीआरपीमुळे जेव्हा चांगलं कथानक असलेली मालिका बंद होते तेव्हा फार वाईट वाटतं. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका वठवणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण या सगळ्यात चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर, कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा?”, अशी खंत प्रसिद्ध निर्माते महेश टिळेकर यांनी बोलून दाखवली आहे.