राज्यात रात्रीची संचारबंदी!

मध्य पूर्व आणि युरोपीय देशांतून येणाऱ्यास विलगीकरण अनिवार्य

0

मुंबई ः राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.,युरोपीय आणि मध्य पूर्व देशांमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवसांसाठी विलगीकरणारत राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच इतर देशांमधून प्रवाशांना घरातच विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, ”करोनाच्या या नव्या विषाणुमुळे राज्यामध्ये अधिक खबरदारी घेण्यात आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या या नव्या करोना विषाणूच्या खबदारीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठांशी बैठक घेतली आहे. लवकरच सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार आहे. राज्यात विवाह सोहळ्यांचे नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
असे आहेत नवे निर्बंध…
१) मध्य पूर्व आणि युरोपातून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य
२) विलगीकरणामध्ये ५ किंवा ७ व्या दिवशी आरटीपीसीआरची चाचणी केली जाणार आणि नेतर कालावधी पूर्ण झाल्यास घरी सोडण्यात येणार
३) ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात, तेथील महापालिका आयुक्तांनी प्रवाशांना विमानतळाशेजारील हाॅटेल्स आणि हाॅस्पिटलची व्यवस्था करावी. नव्या विषाणूची लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णांसाटी स्वतंत्र हाॅस्पिटलची व्यवस्था करावी.
४) प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना गृह विलगीकरणात ठेवले जाईल.
५) प्रवाशांची तपासणी करणाऱ्या सर्व विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट देणार आहेत.
६) युरोप आणि मध्य पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांनी त्यांची माहिती देणे गरजेचे असणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.