मुंबई ः ‘प्राण जाए पर वचन ना जाए, सर कट सकते है लेकिन सर झुका नही सकते’, असा बाणा औरंगजेबाला दाखविणारे गुरू तेगबहादूर हे छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे धर्मवीर ठरले. शिखांच्या शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवून मोदी गुरुद्वार रकीबगंजमध्ये पोहोचले. तरी दिल्लीच्या सीमेवरील शिख विचलीत झाला नाही. त्याचा लढा सुरूच राहिला. गुरू तेगबहादूर यांच्याकडून मोदींना प्रेरणा घेतली, आनंद आहे. दिल्लीच्या आंदोलनातील शीख लढवय्येदेखील त्याच प्रेरणेतून लढत आहे.त्यामुळे या लढाईचा अंत काय, या प्रश्नच आहे, अशी टीका सामनाच्या अग्रेलखातून शिवसेनेनं मोदींवर केली आहे.
पंजाबच्या शेतकऱ्यांना खलिस्तानी, अतिरेकी ठरवून शिखांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भडकलेल्या शिखांच्या भावनांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न मोदींना केला, आता असे म्हटले जात आहे. गुरूद्वारात मोदी गेले त्यामागे राजकारण आहे. खरंच शिखांविषयी प्रेम होते तर, पंजाबच्या शेतकऱ्यांना एक महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर का उभे केले आहे? शिखांच्या अन्नधान्याचे , पोटापाण्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत व शिखांच्या गुरूंसमोर नतमस्कत व्हायचे, हे नाटक आहे, असे विरोधक म्हणत असतीलही. पण मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह कोणी उभे करू नये, अशी टीका मोदींवर केलेली आहे.
मागील महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन छेडले आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलनावरून मोदींवर टीका होत नाही. अशा पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे.