कोथरूडमध्ये तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने तीन वर्षे चिमुरडीचा मृत्यू

0
पुणे : तिसऱ्या मजल्यावरून खाली असलेल्या आईला वापरून होत असताना तो गेल्याने खाली पडल्यामुळे तीन वर्षीय चिमुरडीला जागीच मृत्यू झाला. कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटी रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अविष्का कोळपकर असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, महात्मा सोसायटीतील वृंदावन पार्क या इमारतीत अविष्का कोळकर आई-वडिलांसह राहत होती. अविष्कचे वडील एका खाजगी कंपनीत काम करतात. अनुष्का ही एकुलती एक मुलगी होते.
रविवारी दुपारच्या सुमारास अविष्काची आई भाजी आणण्यासाठी खाली गेली होती. यावेळी अविश्का घरात एकटीच खेळत होती. बराच वेळ झाला तरी आई आली नाही म्हणून ती घराच्या गॅलरीत गेली आणि तेथून ती खाली वाकून पाहू लागली. यादरम्यान तिचा तोल गेल्याने ती तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळली. गंभीर जखमी झालेल्या अनुष्काला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.