खैरे यांनी 2004 पासून सायकल चालविण्याचा चंग बांधला. महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सायकल राइड करुन त्यांनी हा विक्रमी टप्पा पार केला आहे. खैरे यांनी आता पर्यंत पुणे ते सातारा, पुणे ते गौवा, जम्मू ते पुणे, पुणे ते अलिबाग (सोलो राइड), पुणे ते कन्याकुमारी, गोवा सागरी मार्ग राइड, पुणे ते दिवेआगर, पुणे ते ताम्हिणी घाट, पुणे ते काशीद बीच (सोलो राइड) असा सायकल प्रवास चा टप्पा पूर्ण केला आहे.
गावडे यांनी खैरे यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, तरुणांसमोर आदर्श निर्माण करणारी कामगिरी गजानन खैरे यांनी केली आहे. प्राधिकरणातील एक नागरिक निरंतर सायकलिंग करून हा विक्रम करतो ही अभिमानास्पद बाब आहे. शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे ते सदृढ राखण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. खैरे यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. खैरे यांनी 2004 पासून महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सायकल राइड करुन त्यांनी हा विक्रमी टप्पा पार केला आहे.
इंजिनिरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या स्वप्रवत त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. खैरे यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती ती त्यांनी आजतागायत अविरतपणे जपली. जिम, धावणे, चालणे, पोहणे आणि ट्रेकिंग ते करायचे मोबाईल ऍप्लिकेशन ‘एन्डो मोंडो’मध्ये सर्व व्यायाम प्रकारांची नोंद त्यांनी केली. दर आठवड्याला घोराडेश्वर येथे ट्रेकिंग सुरु केले. त्यानंतर कामाच्या ठिकाणी उत्साही मित्र मिळाल्याने पोहणेही सुरु ठेवले. मात्र, सायकल चालविण्याचा छंद सोडला नाही. व्यायामाला जोड म्हणून निगडी ते पुणे विद्यापीठ असा सायकल प्रवास सुरु ठेवला.
अजित पाटील, गणेश भुजबळ हे देखील मित्र जोडले गेले. मुंबई-पुणे महामार्गाला पहिली सोलो सायकल राइड त्यांनी पूर्ण केली. दररोजची राइड सोमाटणे फाट्यापर्यंत असे. त्यानंतर व्हाट्सऍप ग्रुप केले. सर्व राइडची माहिती मित्रमंडळींना व नातेवाइकांना मिळाल्याने अनेकजण जोडले गेले. पहिल्यांदा फारच कमी लोक सायकलिंग करायचे, जशी-जशी लोकांना माहिती मिळत गेली तसतसे अनेक जण जोडून तीनशेच्यावर ग्रुप तयार झाला.
तळेगाव, वडगाव, कान्हे फाटा, कामशेत नंतर लोणावळा पर्यंत राईड गेली. लोणावळा राईड हि पहिली शतकी राईड ठरली तीच राईड पुढे खंडाळ्यापर्यंत गेली. बऱ्याच मोठ्या संख्येने अनेकजण सायकलिस्ट लोणावळा ग्राउंड झिरोपर्यंत सर्रास सायकलिंग करीत आहेत. लोणावळा ग्राऊंड झिरो म्हणजे आपल्या सायकल स्वारांची पंढरी झाली आहे. सायकल ट्रॅक शहरात विकसित होणे गरजेचे असल्याचे मत खैरे यांनी व्यक्त केले.