मुंबई : ”भाजपाला टीका करण्यासंदर्भात भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. टीका करण्यात त्यांचा हात कुणी हात धरु शकत नाही. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये काय चाललं आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बऱ्याच महिन्यांमध्ये परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे जगात काय सुरु आहे ते कदाचित भाजपाच्या नेत्यांना माहित नसावं. केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी का घातली आहे हे कारण जरा अभ्यासू नेत्यांनी तपासावं”, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात संजारबंदी लागू केली आहे. यावरून विरोधा पक्ष भाजपाने सरकारवर टीका करण्यात सुरुवात केली आहे. त्याचा समाचार घेत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, ”भाजपाचे अभ्यासू नेते कुठलाही विषयावर अमर्याद टीका करू शकतात. त्यामुळे आता भारतरत्न दिला पाहिजे. कोही लोकांना पीएचडीची पदवी दिली पाहिजे”, असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला.
महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र कधी लढतील, याची वाटच बघतोय. आम्ही एकत्र लढायला तयार आहोत, असे मत विरोधी पक्षनेने देवेंद्र फडणवीस यांनी मांडले होते. त्यासंबंधी उत्तर विचारले असता राऊत म्हणाले की, ”विधानपरिषदेतील निवडणुकीत आम्ही एक छोटीसी लढाई केली आणि ती लढाई आम्ही जिंकलो. या निवडणुकीत तीन पक्ष एकत्रच होते आणि पुढेही एकत्रच असतील”, असे उत्तर राऊत यांनी म्हटलेलं आहे.