9 लाखात करणार होते दुर्मिळ मांडूळ सापाची विक्री, पण त्यापूर्वीच…

0
पुणे : 9 लाख रुपये इतक्या किमतीत दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी दोन तरुण पुण्यातील सहकारनगर परिसरात आले होते. परंतु या सापाची विक्री करण्यापूर्वी पोलिसांनी त्यातील एका तरुणाला अटक केली तर अन्य दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सहकार नगर परिसरातील अष्टद्वार सोसायटीजवळ ही कारवाई करण्यात आली.
सौरभ अशोक जाधव (वय 21, रा. पिसोळी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे तर आणखी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सहकारनगर पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांना मांडूळ सापाची नऊ लाख रुपयात विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सहकारनगर परिसरातील असतात अष्टद्वार सोसायटी जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता.
त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दौंड दुचाकीवरुन तीन व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस भावले असताना त्यातील दोन व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरले तर मुखेड दुचाकीवरील सौरभ जाधव याला पोलिसांनी पकडले. त्याच्या दुचाकीच्या डिकीतील पिशवीत पोलिसांना दोन किलो वजनाचा मांडूळ जातीचा साप आढळला. आरोपी सौरभ जाधव याने हा साप नऊ लाख रुपये किमतीत विकण्यासाठी पुण्यात आणला असल्याचे सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.