पुण्यात मित्राकडून विश्वासघात ! फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने मैत्रिणीवर बलात्कार

0
 पुणे : पुण्यात एका तरुणाने आपल्या मैत्रिणीवर बलात्कार केलाय. पर्वतीवर फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने या तरुणाने तिला पर्वती टेकडीजवळील जंगलात घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर तिथे बलात्कार केला. 24 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली असून योगेश मोहन मंद्रे (वय २२, रा. निखील पार्क, माणिकबाग) या तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार तरुणी मॉलमध्ये आणि योगेश  एका कंपनीत काम करतो. मॉल व कंपनी हे शेजारी असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली होती.  त्यानंतर योगेशने २४ नोव्हेंबरला रात्री तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार तरुणी त्याला भेटण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपीने तिला पर्वती टेकडीच्या जंगलात घेऊन जात बलात्कार केला.
घटनेनंतर तरुणी घरी गेली होती. त्यानंतरही योगेश तिला सतत त्रास देत असल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस तपास करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.