नवी दिल्ली : ब्रिटनमधील करोनाच्या नव्या प्रजातीचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या सीबीएसई बोर्डात्या परीक्षा या वर्षी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिक्षांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डाॅ. रमेश पोखरियाला निशंक यांनी दिली आहे.
शिक्षा संवाद कार्यक्रमांतर्गत देशभरातील शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. करोना महामारीच्या काळात शिक्षकांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी सध्या करोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या विचार करून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.