पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याचा ठपका

पिंपरीच्या पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाचे निलंबन

0
पिंपरी : गंभीर गुन्ह्याचे कलम कमी करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केला. त्यामुळे न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली. यावरून तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) आणि उपनिरीक्षक अशा दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले. याबाबतचा आदेश मंगळवारी (दि. २२) रात्री उशिरा देण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे)  राजेंद्र निकाळजे आणि उपनिरीक्षक एस. एस. जाधव असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. राजेंद्र निकाळजे यांनी एका गंभीर गुन्ह्यात आरोपींवर लावलेले कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल दिला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली. तसेच, उपनिरीक्षक जाधव यांनी देखील आरोपींवरील दरोड्याचे कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल सादर केला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणातही आरोपींना जामीन मंजूर केला.

पोलीस निरीक्षक निकाळजे आणि उपनिरीक्षक जाधव यांनी कलम कमी करून आरोपींना जामीन मिळण्यास मदत   केली आहे. असा, ठपका ठेऊन त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या आदेशामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.