ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ‘या’ देशाकडून मिळाला ‘जीवन गौरव’ पुरस्कार

0

नवी दिल्ली ः बाॅलिवुडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना अमेरिकेच्या न्यू जर्सीच्या सिनेटने ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. धर्मेंद्र बाॅलिवुडच्या नावाजलेल्या अभिनेत्यांच्या यादीत धर्मेंद्र यांचे नाव घेण्यात येते.

धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यासाठी न्यू जर्सी सिनेट आणि जर्नल असेंब्लीद्वारे एक प्रस्ताव पारित केला होता. दोन्ही सभागृहात हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर धर्मेंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या दोन्ही सभागृहांनी मागील ६ दशकांपासून हिंदी सिनेसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिलेला आहे. सभागृतील ४० सिनेट सदस्यांनी आणि महासभेच्या ८० सदस्यांनी या पुरस्काराला संमत्ती दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या करिअरमध्ये ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलेले आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडलेली आहे. देशात आणि जगात धर्मेंद्र यांचा अभिनय लोकांच्या लक्षात राहिला आहे. हा पुरस्कार स्वीकरत धर्मेंद्र यांनी बाॅलिवुडच्या सर्व लोकांचे आभार मानले आहे. ते म्हणाले की, “मला हा पुरस्कार मिळाला, यासाठी खूप आनंदी आहे. अशा प्रकारचा पुरस्कार मला देण्यात आला, त्याबद्दल मला अभिमान वाटत आहे.”
Leave A Reply

Your email address will not be published.