परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली चिंता

0

मुंबई ः “रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीत परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला, हा चिंतेची बाब आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे”, असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, “आमची सत्ता असताना महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, मागील वर्षभरात हा क्रमांक थेट तिसऱ्या क्रमांकावर आला आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक होते आहे याचा आम्हाला आनंद आहे. मूळात यातले अनेक प्रकल्पाचे एमओयूज हे आमच्या सरकारच्या काळाच झाले आहेत. आता पुन्हा ते होत आहेत हरकत नाही. महाराष्ट्रासाठी जे चांगलं होतं आहे, त्याचा आम्हाला आनंदच आहे”, असेही त्यांनी सांगितले आहे.
“देशामध्ये येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक चारही वर्षे महाराष्ट्रात येत होती.सगळ्यात महत्वाचं मोठी चिंतेची बाब म्हणजे मागील ४ वर्षांत आपल्या पहिल्या क्रमांकाचं एफडीआयचं राज्य केलं होतं. आता आरबीआयने जी आकडेवारी घोषीत केली आहे, त्यामध्ये गुजरात पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे”, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
Leave A Reply

Your email address will not be published.