नवी दिल्ली ः एस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कोविशिल्ड’ लस भारतात आपत्कालीन वापराला सरकार पुढील आठवड्यात मंजूरी देण्याची शक्यता आहे. अशी परवानगी मिळाली तर, कोविशिल्ड वापरणारा हा जगातील पहिल्या देश ठरणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटने या लसीच्या मानवी चाचण्यांचा तपशील औषध महानियंत्रकांनी सादर केला आहे.
जर भारत सरकारने कोविशिल्ड वापराला परवानगी दिली, तर ब्रिटनच्या आधी भारत मंजूरी देईल, अशी शक्यता आहे. या व्यतिरिक्त देशामध्ये फायजर इंडिया व भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी करोना लसीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. नव्या वर्षापासून करोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
महत्वाचे ः ब्रिटनमध्ये आढळून आलेली करोनाची नवी प्रजात अधिक धोकादायक असल्याचे निदर्शास आलेले नाही. अशा साथीच्या फैलावात असे नवे विषाणू तयार होत असतात. सध्या तरी धोक्याचा इशारा देण्याची गरज नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटलेलं आहे.