मुंबई ः ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना प्रारंभ होत आहे. आपल्याला आता शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद-विवाद बंद झाले पाहिजेत. शिवसेनेसोबत स्थानिक पाकळीवर सुळवून घ्या, असा आदेश आदेश उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलेला आहे.
दौंडमधील भाजपा आणि रासपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाल की, “स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत खटके उडत असल्याच्या बातम्या येतात. महाविकास आघाडी मजबूतपणे काम करत आहे. आपल्या दीर्घ काळापर्यंत शिवसेनेसोबत राहायचे आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहण्याची सवय करावी लागेल.
सांगली जिल्ह्याच्या राज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या दौऱ्यात सांगलीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील दुय्यम वागणूक देत असल्याची तक्रार देसाईंसमोर केली होती. त्याच पातळीवर अजित पवारांचे हा आदेश महत्वाचा मानला जात आहे. त्याचबरोबर काॅंग्रेसचे भाई जगताप यांनी मुंबई पालिका स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे मत मांडले होते, अशा पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे विधान महत्वाचे मानले जात आहे.