अनिल कपूर यांच्या जन्मदिवशी करिनाची अनोखी पोस्ट

0

नवी दिल्ली ः बाॅलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर आपला ६४ वा जन्मदिवस साजरा करत आहेत. त्यांचे चाहते त्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनिल कपूर यांना बाॅलिवुडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार सोशल मीडियामधून जन्मदिवसांच्या शुभेच्छा देत आहेत. त्यामध्ये अभिनेत्री  करिना कपूर हिचा समावेश आहे.

‘टशन’ चित्रपटात अनिल कपूर आणि करिना कपूर यांनी सोबत काम केलं होतं. त्याच चित्रपटातील फोटो करिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंडवर स्टोरीरुपात शेअर केली आहेत. आणि अनिल कपूर यांच्यावर करिनाने खास पोस्टदेखील लिहिलेली आहे. या पोस्टच्या माध्यमातून जन्मदिवसाच्या वेगळ्या शुभेच्छा करिनाने अनिल कपूर यांच्यासाठी दिलेल्या आहेत.
करिनाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “अनिलजी तुम्हाला जन्मदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही कायम माझ्या फेवरेट हिरो आहात. आपण दोघे कॅमेऱ्यासमोर कायमच चांगला शाॅट देऊ शकतो.” करिनाची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. करिनाच्या चाहत्यांनीदेखील अनिल कपूर यांवना खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.