तर पाकिस्तानात फटाके फुटतील…”

0

मुंबई : आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. या वक्तव्यावर भाजप नेते निशाणा साधत आहेत. यातच निलेश राणे यांनी ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील’ अशी टीकात्मक टिपणी केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये राणे यांनी, ‘उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाहीत, कुबड्यांवर सरकार चालवतात, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाहीत, हा माणूस पंतप्रधान झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं लावेल हा माणूस.’ असा जोरदार घणाघात केला आहे.

उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर PM झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं लावेल हा माणूस.

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 23, 2020

Leave A Reply

Your email address will not be published.