नव वर्षाच्या सुरुवातीला पुणे-नगर महामार्ग बंद राहणार : जिल्हाधिकारी

0

पुणे : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने मोठी गर्दी होत असते. यातच कोरोनाचा नवा विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत. यासाठी खबरदारी म्हणून 31 डिसेंबर सायंकाळी 5 ते 1 जानेवारी रात्री 9 प्रयत्न पुणे-नगर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे आदेश पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले आहेत.

1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. पण कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे लोकांनी यंदाच्या वर्षी घरातूनच अभिवादन करावे, असं आवाहन आधीच प्रशासनाने केले आहे. त्यानंतर आता 1 जानेवारी रोजी पुणे – नगर महामार्ग बंद राहणार आहे.

तसंच, या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, असं जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.