पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकरीला झिडकारत समीर डोंबे याने शेती करायचे ठरवले. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लाखो रुपयांचे पॅकेज असणारी नोकरी स्विकारली. मात्र समीर हा नोकरीत वा शहरातील लाइफ स्टाईलमध्ये समाधानी नव्हता. त्यामुळे त्याने २०१३ साली नोकरीचा राजीनामा देत थेट दौंड गाठले. गावी गेल्यावर त्याने अंजिराचे पीक घेण्याचे ठरवले.
अडीच एकराच्या संपूर्ण शेतीत त्याने अंजिराचे पीक घेतले. आपल्या मालाची विक्री आपल्या पद्धतीने करायची योजना त्याने आखली. नंतर स्वतःचा ‘पवित्रक’ नावाचा एक ब्रँड रजिस्टर करून घेतला. तसेच आकर्षक पॅकिंगसह ते बाजारात विक्रीला आणले.
रिलायन्स,बिगबाजार, मोर, स्टार बाजार अशा सुपर मॉलमध्ये प्रॉडक्ट विक्रीस उपलब्ध आहे. तसेच मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर अशा ठिकाणी देखील अंजीर व त्याचे बाय प्रॉडक्ट पाठवणे देखील सुरु केले. यातूनच आम्ही माझी अडीच एकराची शेती पाच एकरावर नेली. तसेच मागच्या वर्षी दीड कोटींपर्यंत असलेली उलाढाल यावर्षी अडीच कोटींच्या घरात गेली आहे.
आगामी काळात वाईन व जामचा प्लांट टाकण्याचे नियोजन सुरु आहे. आता आमच्या डोंबेवाडीत जवळपास ३५ ते चाळीस शेतकऱ्यांची मिळून २०० ते २५० एकर शेती मध्ये अंजिराचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्या मालाची पारदर्शीपणे खरेदी करून कष्ट, नुकसान देखील वाचवतो.