“आता कसं वाटतंय गार गार वाटतंय”

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपाला काढला चिमटा

0

मुंबई : “भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचं मी म्हटलेलं नाही. काळजी घ्या तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली, सरकार येणार नाही, आपली कामं होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथं कामं होत नसतील ते परत दुसरीकडे जातील एवढंच म्हटलं. तीन चार महिन्यांत काही गोष्ट घडू शकतात असं म्हटलं तर त्यांना राग आला. त्यांनी इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं. आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं आहे”, असा उपाहासात्मक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर केली आहे.

पुणे विधान भवन येथे अजित पवार यांच्या हस्ते चार एम्ब्यूलन्सचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले की, “सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले”, असेही ते म्हणाले.

शेतकरी आंदोलनावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “आम्ही अजिबात सतावत नाही. त्यांनी त्यांचं काम करावं आणि आमचं आम्ही करतो. जर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत तर तो रस्त्यावर का आला आहे. इतक्या थंडीत आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करावं. इथं बैलगाडीत बसून फोटो काढले. दिल्लीत महाराष्ट्रातूनही शेतकरी गेले आहेत”, अशाही माहिती त्यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.