नवी दिल्ली ः केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत आहे. हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी स्वीकारलेला आहेस अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकरी नेत्यांनी २९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता दिल्लीतील विज्ञान भवनात बैठक होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. आम्ही २९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता चर्चेसाठी केंद्र सरकारसमोर प्रस्वात ठेवतो, असे स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. यादव पुढे म्हणाले की, “चर्चेसाठी दोन मुद्दे आहेत. तिन्ही कृषी कायदे मागे कसे घेणार आणि दुसरा मुद्दा किमान आधारभूत किंमतीला कायदेशीर हमी देणं आणि त्यासाठी कायदा तयार करणे”, असे यादव यांनी सांगितले.
मागील महिनाभरापासून दिवसेंदिवस शेतकरी आंदोलन तीव्र रुप धारण घेत आणि केंद्राने शेतकऱ्यांसाठी वापरलेले नवनवे फंडे नाकामी ठरत आहेत. नाताळा, शनिवार आणि रविवार सगलपणे सुट्टी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उत्तरप्रदेशच्या गेटवर मोठ्या संख्येने जाट शेतकरी पोहोचलेले आहेत. त्यामुळे पोलीस सुरक्षा आणखी वाढविण्यात आली होती.