३० डिसेंबरला एकनाथ खडसे ईडी कार्यालयात जाणार

0

जळगाव ः भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना नोटीस प्राप्त झाली आहे. ३० डिसेंबरला मुंबईच्या ईडी ऑफिसमध्ये बोलण्यात आले आहे. या चौकशी आपण सर्व सहकार्य करणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

याप्रकरणातील ही पाचवी चौकशी आहे. भोसरी येथील जमीन पत्नी मंदाकिनी यांनी खरेदी केली होती. एकत्रित कुटुंब असल्यामुळे कदाचित माझ्या नावाने ईडीची नोटीस निघाली असेल, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

“माझ्याविरोधात सुरु असलेल्या चौकशांमुळे आश्चर्य वाटत आहे. मला नेहमी वाटायचं की ईडी १०० कोटी किंवा त्याहून अधिकच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालतं. जर हे पुणे जमीन प्रकरणाबद्दल असेल तर त्यात चार कोटींहून कमी व्यवहार आहे. ज्या जमिनीबद्दल चर्चा आहे ती माझी पत्नी आणि जावयाने विकत घेतली होती. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आहे. या व्यवहाराची चौकशी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मला आधीच क्लीन चीट दिली आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या आयोगाने केलेल्या चौकशीतही काही समोर आलं नव्हतं”, असे खडसे यांनी स्पष्ट केलेलं होते.

Leave A Reply

Your email address will not be published.