मुंबई ः बाॅलिवुडमधील काही वादग्रस्त अभिनेत्रीपैकी असलेली अभिनेत्री स्वरा भास्करचा सध्या ख्रिसमसचा साजरा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वराने चक्क वाईनने भरलेल्या ग्लासमध्ये बिस्किट बुडवून खाल्लेली दिसत आहे. आणि त्यात ती म्हणाली की, “मित्रानो, ख्रिसमसदिवशी ही आहे सर्वात बेस्ट रेसिपी”, स्वराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
स्वरा कॅप्शनमध्ये पुढे म्हणते की, “बिस्किट वाईनमध्ये सावधतेने बुडवा आणि लगेच खाऊन टाका.” स्वरा भास्करचाा व्हिडीओ फिल्मफेअरच्या इन्स्टाग्राम अकाउंडवरून शेअर करण्यात आला आहे. यावर स्वराचे चाहते मोठ्या प्रमाणात काॅमेंट्स करत आहेत. स्वराचा हा व्हिडीओला लाईक्स मिळत आहेत आणि शेअरदेखील होत आहे.
स्वरा ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. आपल्या सडेतोड विचाराने आणि वेगळ्या अभिनयाने स्वरा भास्कर प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. अभिनयाशिवाय स्वरा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत असते. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘शीर कुर्मा’. त्यामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच शबाना आजमी आणि दिव्या दत्तादेखील त्यात दिसणार आहेत.