मुंबई ः प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमोला डिसूझाला हार्ट अटॅक आलेला होता. सध्या तो बरा असून आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतो आहे. मात्र, याप्रसंगी नेमके काय झाले होते आणि ऐनवेळी कोण मदतीला धावून आले यासंदर्भात रेमोची पत्नी लिजेनने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यांचे मदत करणाऱ्यांचे आभार मानले. त्यामध्ये सलमान खानचे नाव अग्रस्थानी आहे. लिजेनने सलमान खानला देवदूत म्हंटलं आहे.
रेमोला कोकिळाबेन हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्यानंतर लिजेनने पहिला फोन केला तो सलमान खानला. व्यस्त असल्याकारणाने फोन उचलला नाही. ५ मिनिटांनतर सलमानने लगेच काॅलबॅक केला. त्यावेळी रेमोची अवस्था अत्यंत खराब झाली होती. लिजेनचा धीर खचत चालला होता. ती एकटीच रुग्णालयात होती. मुलांनीही तिने सांगितले नव्हते. पहिला मुलगा झोपला होता, तर दुसरा जीममध्ये गेलेला होता. मात्र, असा कठीण प्रसंगी सलमानची अख्खी टीम डाॅक्टरांच्या संपर्कात होती. सलमानही लिजेनला सतत धीर देत होता. त्यामुळे लिजेनचा सलमानशी बोलून धीर वाढला.
रेमो फोम बाॅलसोबत काही व्यायाम करत होता, त्यावेळी त्याच्या छातीत दुखू लागले. एसिडीटी झाली असेल म्हणून रेमोनला वाटले. मात्र, जिना चढतामा रेमो उलट्या करू लागला. त्यावेळी तातडीने लिजेनने हाॅस्पिटलमध्ये रेमोला हलविले. अशावेळी लिजेन खूप घाबरली होती. त्यावेळी सलमान खान संपर्कात आला आणि त्याने लिजेनला धीर दिला. त्यामुळे सलमान खानचे हृदय सोन्याचे आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.