कोथरुडमध्ये अर्धवट बांधलेल्या बंगल्यात वॉचमनचा खून

0
पुणे : कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अर्धवट बांधलेल्या बंगल्यात वाचमन असणाऱ्या व्यक्तीचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिलीप उर्फ रवींद्र रावण तावरे (वय ४७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 25 डिसेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला असून अलंकार पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत व्यक्ती त्याची आई आणि दोन मुले अर्धवट बांधकाम झालेल्या या बंगल्यात राहायला होते. 25 डिसेंबर रोजी दिलीप तावरे हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांच्या मुलाने पाहिले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची माहिती अलंकार पोलिसांना देण्यात आली.
अलंकार पोलिसांनी दिलीप तावरे यांचा मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदनाच्या अहवालात तावरेचा गळा दाबल्याचे तसेच त्याला मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.