मुंबई ः राज्यात दिवसेंदिवस करोना संक्रमण वाढतच आहे. करोनाने मृत्यू होणाऱ्या संख्येत वाढ होत आहे. आज दिवसभरात आज दिवसभरात ३ हजार ३१४ नवे करोनाबाधित आढळले असून, ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
याशिवाय, दिवसभरात २ हजार १२४ जणांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख १९ हजार ५५० वर पोहचली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रिकव्हरी रेट ९४.२९ टक्के आहे.
सद्यस्थितीला महाराष्ट्रात ५९ हजार २१४ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,२,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १९ हजार ५५० (१५.३५ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ५७ हजार ३८५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ३२३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.