मुंबई ः दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार जाणार आहे. याआधी शरद पवार यांनी न्यूज १८ शी बोलताना सांगितले की, युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पवारांनी युपीएच्या अध्यक्षपदासंबंधी जे वृत्त येत होते, ते फेटाळले आहे”, त्यामुळे पवारांनी दुसऱ्यांदा हे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
केंद्रातील विरोध पक्ष खिळखिळा आणि कमजोर होत चालला आहे, त्याला भक्कम करण्याची गरज आहे, असे मत शिवसेनेनं वारंवार सांगितलं आहे. त्यासाठी शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची धूरा सोपवावी, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील मांडले होते. अशा पार्श्वभूमीवर शरद पवारांची भूमिका महत्वाची आहे.
काय म्हणाले होते शरद पवार…
“माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी याआधीदेखील युपीए अध्यक्ष होण्याचं वृत्त फेटाळलं होतं. प्रसारमाध्यमांशी बोलताना शऱद पवार यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका”, असे स्पष्ट मत शरद पवारांनी मांडले होते.