युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चेवर पी चिदंबरम यांची महत्वाची प्रतिक्रिया

0

मुंबई ः “हे काही पंतप्रधानपद नाही आणि शरद पवार यांचीही युपीए अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची घोषणा किंवा निवड व्हावी अशी इच्छा नसेल. जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल”, असे वक्तव्य काॅंग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी केले आहे.

पी चिदंबरम पुढे म्हणाले की, “मित्रपक्षांची बैठक बोलावली तर काँग्रेस अध्यक्ष त्याचं नेतृत्व करणार हे नैसर्गिक आहे असं ते म्हणाले आहेत. “युपीएची बैठक घेण्यासाठी काही पक्ष पुढाकार घेऊ शकतात आणि काँग्रेस त्यात सहभागी होईल. पण जर काँग्रेसने बैठक बोलावली असेल तर काँग्रेसचाच नेता बैठकीचं नेतृत्व करेल”, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते…
“देशात विरोधी पक्ष खिळखिळा असून संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए )मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावं,” अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मांडली. “शरद पवार यांच्याकडे यूपीएचे नेतृत्व सोपविल्यास शिवसेनेसह रालोआतून (एनडीए) बाहेर पडलेल्या पक्षांसह देशभरातील भाजपविरोधातील पक्षही यूपीएमध्ये सहभागी होण्याचा विचार करतील”, असे मत राऊत यांनी मांडले होते.

संबंधित बातमी वाचा : युपीएचे अध्यक्ष होण्याचा विचार आणि वेळही नाही ः शरद पवार 

Leave A Reply

Your email address will not be published.