टिंडरवरुन ओळख झालेल्या तरुणाकडून तरुणीवर बलात्कार

0
पुणे : टिंडर या ऍपवरुन ओळख झालेल्या एका तरुणाने तरुणीस हिंजवडी  हाॅटेलवर नेऊन तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर संबंधित तरुणीला तिच्या घरी घेऊन जात तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता, तरुणीने विराेध दर्शवल्याने संबंधित आराेपी तरुणाने तरुणीला लाथाबुक्क्याने मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी आराेपी अभिजीत सिताराम वाघ (रा.काळेवाडी,पुणे) याला हिंजवडी पाेलीसांनी अटक केली आहे. त्याच्या विराेधात पिडित महिलेने तक्रार पाेलीसांकडे दिली आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित तरुणी व आराेपी अभिजीत वाघ यांची टिंडर ऍपवर ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेऊन अभिजीत याने सदर तरुणीला शनिवारी दुपारी चार वाजता हिंजवडी मधील एफएमएल हाॅटेलवर नेले.
त्याठिकाणी तिला जबरदस्तीने दारु पाजली व त्यानंतर महिलेस तिच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तरुणी साेबत ताे लगट करु लागल्याने तरुणीने त्यास विराेध दर्शवला असता आराेपीने तिला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करुन तिला डाव्या डाेळयावर, कानावर, ताेंडावर जखमा करुन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. याबाबतचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक संगीता गाेडे करत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.