गृहमंत्रालयाकडून करोनाच्या नियमावलीत ३१ जानेवारी पर्यंत वाढ

0

मुंबई ः  ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या करोना प्रजातीमुळे ३१ जानेवारी पर्यंत गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीत वाढ केलेली आहे. त्यामध्ये गृहमंत्रालयाने म्हटलं आहे की, “कन्टेंन्मेंट झोनचे सावधगिरीने सीमानिश्चिती करणे सुरुच राहिल. कन्टेंन्मेंट झोनमध्ये सुरुवातीपासून निश्चित करण्यात आलेल्या संसर्ग रोखण्याच्या उपायांचे कडक पद्धतीने पालन केलं जाईल. कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंसिंग राखण्यासारख्या नियमांचे सक्तीने पालन करावे लागेल”, असे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

करोनाच्या नव्या प्रजातीचा संसर्ग वाढू नये यासाठी अधिक काळजी घेतली जात आहे. मध्य युरोप आणि ब्रिटनमध्ये आढळेलेल्या नव्या प्रजातींमुळे करोना संसर्ग अधिक वेगाने होत आहे. आणि जगातील अनेक देशांसमोर करोनाचे आणखी एक नवे संकट उभे राहिले आहे. अशा पार्श्वभूमिवर दक्षता घेण्यासाठी आणि गृहमंत्रालयाने निमय कडक केले आहे. तसेच ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमध्ये करोना पाॅझिटिव्ह आढळल्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे ३१ जानेवारी पर्यंत नियमावलीत वाढ केलेली आहे.

देशातील करोना संक्रमणाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सावधानी राखणे गरजेचे आहे. विशेष करून ब्रिटनमध्ये सापडेलेल्या करोनाच्या नव्या प्रजातीमुळे जास्त काळजी घेणे क्रमप्राप्त झालेले आहे. अशा परिस्थितीत काळजी घेणं महत्वाचे आणि आवश्यक असल्याचे गृहमंत्रालयाने सांगितलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.