सावंतवाडी : “ज्यांच्यासंदर्भात तक्रारी असतील आणि पुरावे असतील त्यांची चौकशी होते .मात्र आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही. भाजपने कोणत्याही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही. उलट काँग्रेसच्या काळातच तो चौकशी संस्थांच जास्त वापर झाला आहे”, असे थेट हल्ला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसवर केला आहे.
राज्य सरकारचा बांधकाम घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यामधील संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूरहून आंबोलीमार्गे गोव्याला जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते. त्यावेळी त्यांनी काॅंग्रेस पक्षावर निशाण साधला. ते म्हणाले की, “तुम्ही जर काही केले नसेल तर घाबरता कशाला?”, असा सवाला त्यांनी सत्ताधारी पक्षाला विचारला.
“बांधकाम क्षेत्रा बाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे.यातील घोटाळे मी स्वत: उघडकीस आणले आहेत. त्याची चौकशी करा अन्यथा मला उच्च न्यायालयात जावे लागेल. असा इशाराही त्यांनी दिला. तसेच कोकणातील शेतकऱ्यांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. मी अनेकांशी बोललो आहे. त्यांनीही अशी कोणतीही मदत आली नसल्याचे सांगितले”, असेही मते फडणवीस यांनी व्यक्त केले.