रिंकू राजगुरू पुण्यातच आहे, कुटुंबाचा खुलासा

0
मुंबई ः ब्रिटनमध्ये करोनाची नवी प्रजाती आढळल्यामुळे बरेच भारतीय अडकून पडले आहेत. त्यामध्ये आपल्या मराठी कलाकारांचा समावेश आहे. सध्या ब्रिटनमध्ये लाॅकडाऊन पडलेला आहे, त्यामुळे मराठी इंडस्ट्रीतील कलाकार आणि तंत्रत्र अडकलेले आहेत. सैराटमधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूदेखील ब्रिटनमध्ये अडकली आहे, अशा आशयाचे वृत्त सतत येत होते. मात्र, त्यावर रिंकुच्या कुटुंबियांनी खुलासा केलेला आहे.
काही दिवसांपूर्वी रिंकू लंडनला चित्रपटच्या चित्रीकरणासाठी गेली होती. मात्र, रिंकू राजगुरू लंडवमध्ये विमाने बंद असल्यामुले अडकली आहे, हे वृत्त खोटे आहे. चित्रपटाच्या शुटिंगसाठी रिंकू लंडनला गेली होती, हे जरी खरे असले तरी ती मागील महिन्यातच भारतात परतली असून ती सध्या पुण्यात आहे, अशी माहिती रिंकूच्या कुटुंबियांनी दिली.
आगामी चित्रपट ‘छुमंंतर’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये रिंकू व्यस्त आहे. चित्रपटात सुव्रत जोशी, प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे आदी कलाकरादेखील आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करून असून याच चित्रपटाच्या शुटिंगसाठी रिंकू राजगुरू लंडनमध्ये गेलेली होती.
Leave A Reply

Your email address will not be published.