दाक्षिणात्य अभिनेता राम चरण करोना पाॅझिटिव्ह

0

मुंबई ः दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरण याला करोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलेले आहे, अशी माहिती राम चरणने स्वतः सोशल मीडियावरून दिलेली आहे. रामचरणने करोनाची लक्षणं नाहीत. मात्र, माझा करोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती त्याने ट्विटरवरून दिलेली आहे.

“माझी करोना चाचणी पाॅझिटिव्ह आलेली आहे. सध्या तरी मला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. मी घरातच क्वारंटाईन झालेलो आहे. आशा आहे की, मी लवकरच बरा होईन. तसेच माझ्या संपर्काच आलेल्या सर्वांनी स्वतःची करोना चाचणी करून घ्यावी. माझ्या तब्येतीची माहिती मी लवकरच कळवेन”, अशा आशयाचे ट्विट राम चरणने केलेले आहे.

यापूर्वी नोव्हेंबरमध्ये राम चरणच्या वडीलांनी करोना झाला होती. तिसऱ्यांदा चाचणी केल्यानंतर करोना चाचणी निगेटिव्ह आली होती. रामचरण सध्याचे काम हे एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआरसोबत राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  या चित्रपटात बाॅलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.