फिर्यादीच निघाला घरफोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी

0

पिंपरी : सांगवी पोलिसांनी अटक केलेल्या चौघांकडून 9 लाख एक हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विशेष म्हणजे या गुन्ह्यात फिर्यादी यानेच घरफोडी केल्याचे उघडकीस आले. विकी बाजीराव पाटील (20, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी), तोहेब फय्याज खान (29), विशाल बाळू माने (32, दोघे रा. खडकी), योगेश उर्फ घा-या संजय यादव (28, रा. धानोरी रोड, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात विकी पाटील याने फिर्याद दिली होती. त्या घरफोडीमध्ये घरातून अडीच लाख रुपये किमतीचे 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

त्या गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी विकी पाटील हाच चोर असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याच्याकडे उलट तपासणी केली असता त्यानेचा हा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून अडीच लाखांचे दागिने, 50 रुपयांचा स्क्रू ड्रायव्हर जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.