ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना ऑफलाइन अर्ज भरता येणार
उद्या साडेपाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वाढविली मुदत
मुंबई ः राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी एक दिवसच शिल्लक असल्याने उमदेवारांची झुंबड उडली होती. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या, त्यात सर्व्हर डाऊन झालेला होते. त्यामुळे उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी ताटकळत थांबावे लागत होते, याचा विचार करून निवडणूक आयोगाने नामनिर्देश पत्र दाखल करण्यासाठी पारंपरिक पद्धत्तीचा ऑफलाइन मोडमध्ये सादर आदेश काढला आहे.
राज्यात निमनिर्देश पत्र दाखल करण्याची मुदत वाढविली असून ३० डिसेंबरपर्यंत म्हणजेच ५.३० वाजेपर्यंत उमेदवाराला अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज मोठ्या प्रमाणात भरले जात होते, त्यामुळे सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे उमेदवारांना हातात अर्ज घेऊन रांगेत ताटकळत उभे राहावे लागत होते.
उमेदवारांची होणारी तारांबळ पाहून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संकेतस्थळाचे हॅंग होणे, सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे शासकीय कागदपत्रे न मिळणे, अशा अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागत आहे, ही समस्या निवडणूक आयोगाकडे सांगितली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने वरील आदेश जारी केला.