नवी दिल्ली : मोदी सरकारने कारने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. कारमध्ये दोन्ही बाजूने एअर बॅग्स लावणे यापुढे बंधणकारक असल्याचा आदेश रस्ते, परिवहन मंत्रालयाने काढला आहे.
राज्य परिवहन मंत्रालयाने याबद्दल एक अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार, या पुढे देशातील प्रत्येक कार उत्पादक कंपन्यांना कारमध्ये चालक आणि त्यांच्या बाजूने असलेल्या सीटवर एअर बॅग्स देणे बंधणकारक असणार आहे.
1 एप्रिल 2021 पासून या आदेशाची अंमलबाजवणी केली जाणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलनंतर बाजारात येणाऱ्या प्रत्येक कारमध्ये तुम्हाला चालकासह बाजूच्या सीटवर सुद्धा एअर बॅग्स मिळणार आहे. तसंच, जी वाहनं सध्या बाजारात येण्यास तयारी झाली आहे, त्या वाहनांमध्ये 1 जून 2021 पर्यंत एअर बॅग्स सुविधा कार उत्पादक कंपन्यांना द्यावी लागणार आहे.
कार चालक आणि त्याच्या बाजूच्या सीटवर जर दोन्ही बाजूने एअर बॅग्स दिली तर कारच्या उत्पादनात खर्च वाढणार आहे. परिणामी याचे पडसाद हे कारच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ‘जर कारच्या दोन्ही बाजूने एअर बॅग्स दिले तर कारच्या किंमतीत 4 हजार ते 6 हजार रुपये वाढ होण्याची शक्यता आहे’, असं कार उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.