डाॅ. शितल आमटेंचा श्वास अडकल्याने मृत्यू

0

चंद्रपूर ः महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शितल आमटे-करजगी यांनी आपल्या निवासस्थानी ३० नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्यासंदर्भातील शितल आमटेंच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला आहे. या तपासासंदर्भात पोलीस अधिक्षक अरविंद साळवे म्हणाले की, श्वास अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अजूनपर्यंत कोणताही घातपातातचा पुरावा मिळालेला नाही, अशी माहिती साळवे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

साळवे म्हणाले की, “डॉ. शीतल या मागील दीड वर्षांपासून नागपूर येथे मानसोपचार तज्ज्ञांकडे औषधोपचार घेत होत्या. जून महिन्यात मानसिक तणावामुळे झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २१ नोव्हेंबर रोजी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टला प्राणघातक इंजेक्शनच्या उपलब्धतेविषयी विचारणा केली होती. घटनास्थळावरून सदर तीन इंजेक्शन, निउक्युरॉन इंजेक्शन फुटलेल्या अवस्थेत व वापरलेले सीरिंज आढळले होते. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. तपासादरम्यान आजवर २६ साक्षीदारांचे साक्ष नोंदविण्यात आली आहे.”

ज्या ठिकाणी घटना घडली तेथून जप्त केलेला मुद्देमाल व्हिसेरा तपासणीसाठी चंद्रपूर आणि नागपूर प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर ३ मोबाईल, एक लॅपटाॅप, टॅब्लेट हेदेखील मुंबईच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. याचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत. ते मिळताच योग्य तो तपास करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.