नवी दिल्ली ः चारचाकी वाहनधारकांनी फस्टॅग लावण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत केंद्रसरकराने मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे चाकचाकी वाहनधारकांनी केंद्राकडून दिलासा मिळालेला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १ जानेवारीपासून देशातील सर्व चारचाकी वाहनधारकांना फास्टॅग अनिवार्य केले होते. तसेच कोणताही कॅश व्यवहार होणार नाहीत, तसेच फास्टॅग अनिवार्य असेल, असेही एनएचएआयने म्हणेज भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाने जाहीर केलेले होते. परंतु, ही त्यामध्ये १ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
असा होईल फास्टॅगचा वापर…
फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर गाडीचे इंधन आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. तसेच संबंधित वाहनधारकडील फास्टॅगमधून टोलचे पैसे वजा होणार आहे. वजा झालेल्या पैशांचा एसएमएस संबंधिताच्या मोबाईलवर येईल. समजा फास्टॅगमधील पैसे संपले तर, ते पुन्हा भरावे लागतील म्हणजेत रिचार्ज करावे लागेल. त्याची वैधता ५ वर्षांची असेल. ५ वर्षे संपली तर, पुन्हा फास्टॅग घ्यावा लागेल. वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र, वाहन चालकाचा फोटो, केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि वास्तव्याचा दाखला, अशी कागदपत्रांची पूर्तता फास्टॅग घेण्यासाठी करावी लागेल.