मटण तोडण्याच्या कोयत्याने दोघांवर जीवे ठार मारण्यासाठी हल्ला

0
पिंपरी : चिंचवड, विद्यानगर येथे किरकोळ वादातून चौघांनी मिळून दोघांवर मटण तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने एकाच घरातील दोघे जखमी झाले आहे. ही घटना गुरुवारी रात्री आकाराच्या सुमारास घडली आहे. यावरून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विक्रम भवरसिंग राठोड (22, रा. विद्यानगर) याने फिर्याद दिली आहे. तर विक्रम आणि आकाश राठोड हे दोघे जखमी झाले आहेत. तर तिफाना स्पेशल काळे, करण काळे, किरण काळे आणि गब्बर पवार या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
विक्रम हा घरात असताना शेजारी राहणाऱ्या तिफाना घरी आल्या. घरावर दगड टाकले म्हणून वाद घालत, बाहेर ये बघते तुला असे म्हणाल्या. त्यामुळे विक्रम हा बाहेर आला. त्यावेळी त्याला या चौघांनी शिवीगाळ सुरु केली. हे ऐकून विक्रमचा भाऊ आकाश आणि त्याचा मित्र तेथे आले. त्यावेळी या चौघांनी हातात असलेल्या मटण तोडण्याच्या कोयत्याने आकाशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तो विक्रमने स्वतःच्या हातावर घेतला. यावेळी झालेल्या वादातून आकाश वाचविण्यास आला असता त्याच्यावरही वार करण्यात आले. डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.