नवी दिल्ली ः २०२० वर्षामध्ये अनंत संघर्ष करत आपण २०२१ या नूतन वर्षाच्या स्वागतासाठी आपण तयार झालो आहोत. सर्वांची आशा आहे की २०२१ हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचे आणि व्यवस्थित जावे. भेलही आपण करोना विषाणुच्या संक्रमणाबरोबर संघर्ष करत असू. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कविता रचलेली आहे. मोदींनी ‘अभी तो सूरज उगा है’ या कवितेच्या माध्यमातून संघर्षातून वाट काढत नव्या प्रकाशाचा संकल्प करण्याचे आव्हान नरेंद्र मोदींनी केले आहे.
ही कविता माय @MyGovIndia या ट्विटरवरून व्हिडीओच्या स्वरुपात शेअर करण्यात आली आहे. मोदींनी ही कविता लिहिली आहेच, पण त्याचबरोबर त्या कवितेला आपला आवाजदेखील दिलेला आहे. या कवितेबरोबर मोदींनी ट्विटरवरून देशाला नव वर्षाच्या शुभेच्छादेखील दिलेल्या आहेत. ते ट्विटमध्ये म्हणतात की, “सर्वांना २०२१ या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी आरोग्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. आशा आणि कल्याणच्या तुमच्या भावना प्रबळ होवो.”
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला लक्षात घेऊन यंदा देशाच्या अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देश या काळामध्ये नवीन वर्षाचे स्वागत करत आहे की, करोना रुग्णांच्या केसेस कमी होत आहेत, तर काही देशांमध्ये करोनाच्या नव्या प्रजातीचा शिरकाव झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर करोनाच्या नव्या प्रजातीचा फैलाव जास्त होऊ नये म्हणून प्रशासनव्यवस्था खबरदारी बाळगत आहे.