मुंबई ः संपूर्ण देशात करोना लसीकरणाची ड्राय रन होत आहे. महाराष्ट्रातील पुणे, नंदूरबार, नागपूर आणि जालना जिल्ह्यांचा ड्राय रनमध्ये समावेश आहे. तर, “करोना लसीकरणानंतर प्रत्येकाला चार सूचना केल्या जातील. लसीकरणाच्या पुढच्या डोसची तारीख त्यांना देण्यात येईल. त्यानंतर, लसीकरणानंतरच्या काळात त्यांना कसं वागावं याच्या सूचना करण्यात येतील”, अशा माहिती राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
“लस घेतली म्हणजे करोनामुक्त झालो अशा गाफिलपणा बाळगू नका. लसीकरणानंतरही सोशल डिस्टनसिंग आणि मास्क बंधनकारक असणार आहे. लसीचे परिणाम जाणवायला दोन ते चार महिने लागू शकतात. लस घेतल्यानंतरही काही जणांना थोडापार परिणाम जाणवू शकतो, त्यांना अर्धा तास डाॅक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल”, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे पुढे असे सांगितले की, “जर लसीकरणानंतर जर कोणाला त्रास जाणवलाच तर त्वरीत संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाई. एक केंद्रामध्ये १०० जणांनाच लसीकरणाचे नियोजन केले जाईल. यासाठी ओळखपत्र व करोना लस एपची पडताळणी करणारे पोलीस, शिक्षक आणि नंतर लसीकरण असे तीन टप्पे रुग्णाला पार पाडावे लागणार आहेत”, असा माहिती टोपेंनी दिली आहे.