नवी दिल्ली ः भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हार्ट अटॅ आल्याने दक्षिण कोलकातामदील वूडलॅण्ड या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी त्याच्यावर अँजिओप्लास्टीचे आपरेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हाॅस्पिटलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करताना अचानक त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्यानंतर त्वरीत रुग्णालयात हलविण्यात आले. डाॅक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. या घटनेनंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ट्विट करत सौरव गांगुलीच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांनी अशी माहिती दिली आहे की, “गांगुलीला हृदयाच्या त्रासामुळे वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या गांगुलीची प्रकृती स्थिर आहे असे हॉस्पिटलमधील सूत्रांनी सांगितलं आहे. काही तासांतच गांगुलीला डिस्चार्जही दिला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर त्याच्या वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याला हृदयाचा विकार असल्याचे निष्पन्न झालं. डॉ. सरोज मोंडल यांच्यासह तीन डॉक्टरांची टीम गांगुलीवर उपचार करत आहे.”